कार खरेदी करताना अनेकदा केंद्रस्थानी असणारा विचार म्हणजे आपलं कुटुंब त्यात मावेल ना? सामान्य कुटुंबांमध्ये कार हा विषय अतिशय जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाच्या चर्चेचा मुद्दा. चला तर मग, तुमच्या खिशाला परवडणाऱ्या कारचे पर्याय पाहूया...
1.5 लीटर पेट्रोल इंजिन आणि सीएनजी अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असणारी मारुती अर्टिगा ही कार 8.69 लाखांना उपलब्ध असून ती 26.11 किमी इतकं मायलेज देते.
सर्व अद्ययावत सुविधा असणारी ही कार 7 इंच इंफोटेन्मेंट पॅडल शिफ्टरसह उपलब्ध असून त्यात कमाल फिचर देण्यात आले आहेत.
6 लाखांच्या खर्टाच तुम्ही रेनॉल्ट ट्रायबर ही कार खरेदी करू शकता. नॅच्युरल एस्पिरेटेड आणि टर्बोचार्ज पेट्रोल इंजिनचे पर्याय या कारमध्ये मिळतात. ही कार 19 किमी इतकं मायलेज देते.
रेनॉल्टच्या या कारमध्ये 8 इंच टचस्क्रीन इंन्फोटेन्मेंट सिस्टीम, थर्ड रो एसी, माऊंटेड स्टीअरिंग व्हील्स असे फिचर्स आहेत. कारमध्ये रिअर व्ह्यू आणि पार्किंग सेंसरही आहे.
5.32 लाख इतक्या किमतीला असणारी मारुती ईको या कारची के सीरिज बरीच लोकप्रिय आहे. पेट्रोल मोडमध्ये ही कार 19.71 इतकं मायलेज देते. तर, सीएनजीमध्ये 26.78 इतकं.