अनेकदा लोकांना प्रवासापूर्वी हलके अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून प्रवासादरम्यान तब्येत बिघडू नये.
तज्ज्ञांच्या मते,उंचीवर दबावामुळे शरीरातील पाणी कमी होते.त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही.अशा परिस्थितीत लोकांनी विमान प्रवास करताना काही पदार्थ खाणे टाळावे.
उड्डाण करण्यापूर्वी शेंगा किंवा बीन्स यांच सेवन करणं टाळा. केबिन प्रेशरमुळे पचनावर परिणाम होतो. यामुळे सूज येण्याची समस्या देखील होऊ शकते.
उड्डाण करण्यापूर्वी ब्लॅक कॉफी पिणे टाळा.विमानात कमी आर्द्रता असल्याने शरीरातील पाणी कमी होते. अशावेळी कॉफीमुळे शरीरात डिहायड्रेशन होते कारण ती लघवीचे प्रमाण वाढवते.
तेलकट पदार्थांच सेवन करणं टाळावेय यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो.
विमानात केबिन प्रेशरमुळे शरीरातील पाणी कमी होते. अशावेळी शरीरात डिहायड्रेशन होऊ देऊ नका. पुरेसे पाणी प्या.
विमानात प्रवास करण्यापूर्वी फ्लॉवर आणि कोबी सारख्या भाज्या खाणे टाळावे. ते पचण्यास जड असतात. ज्यामुळे गॅस आणि पोट फुगणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)