प्लास्टिकच्या भांड्यात गरम जेवण ठेवल्याने त्याचा शरीरावर खूपच घातक परिणाम होतो. आरोग्यासाठी प्लास्टिकच्या भांड्यातील जेवण धोक्याचे ठरते.
प्लास्टिकच्या भांड्यात गरम जेवण ठेवल्याने कँसरसारख्या समस्या उद्भवू शकतात.
जरी प्लास्टिकच्या भांड्यात गरम जेवण ठेवणे धोक्याचे असले तरी त्यातील काही प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये गरम जेवण ठेवणे सुरक्षित मानले जाते.
HDPE हे मजबूत आणि टीकाऊ प्लास्टिक आहे. तसेच या प्लास्टिकच्या उपकरणांवर '2' या अंकाची खूण असते जी प्लास्टिकच्या सुरक्षिततेची श्रेणी दर्शवते.
HDPE प्लास्टिकचा वापर दूधाचे कंटेनर, ज्यूसच्या बॉटल्स तसेच विविध फूड कंटेनर मध्ये केला जातो.
पॉलिप्रोपायलिन प्लास्टिक सुद्धा सुरक्षिततेच्या दृष्टीने उत्तम मानले जाते. या प्लास्टिकच्या उपकरणांवर '5' या अंकाची खूण असते.
पॉलिप्रोपायलिन प्लास्टिकचा वापर दह्यांचे कप, औषधांच्या बाटल्या यासारख्या अनेक फूड कंटेनर मध्ये केला जातो.
या प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये गरम पदार्थ ठेवणे जरी सुरक्षित असले तरीसुद्धा मायक्रोवेव मध्ये या प्लास्टिकचा वापर करणे धोकादायक ठरु शकते. त्यामुळे मायक्रोवेव मध्ये अशा प्लास्टिकचा वापर करणे टाळा.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)