मुघल साम्राज्यातील सर्वात सुंदर बेगम नूरजहाँ होती.
अनेक स्त्रोतांनुसार तिला सर्वात सुंदर मुघल बेगम अशी पदवी बहाल करण्यात आली होती.
असं म्हणतात की, नूरजहाँला पाहताच क्षणी जहांगीर प्रेमात पडले होते.
नूरजहाँला मिळवण्यासाठी जहांगीरने सर्व युक्त्या अवलंबल्या होत्या.
जहांगीरने कट रचून नूरजहाँच्या पतीची हत्या केली होती.
त्यानंतर जहांगीरने नूरजहाँला लग्नासाठी राजी केलं.
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, नूरजहाँ हे नाव नसून एक उपाधी आहे.
मुघल बेगम नूरजहाँचं खरं नाव मेहरुन्निसा होतं.
मेहरुन्निसा लग्नानंतर जहांगीरकडून ही पदवी देण्यात आली होती.
जहांगीरला अनेक बायका होत्या पण तो नूरजहाँवर सर्वात जास्त प्रेम करायचा.