हिवाळ्यात प्रत्येकाला अंथरुणामध्ये पडून राहावे वाटते. पण हिवाळ्यात सर्वात जास्त झोप का लागते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? जाणून घ्या सविस्तर
हिवाळ्यात दिवस लहान आणि रात्र मोठी असते. यामुळेच लोकांची झोप पूर्ण होत नाही. लोक दिवसभर आळशी आणि झोपेत असतात.
हिवाळ्यात सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे व्हिटॅमिन डीची पातळी कमी होते. त्यामुळे लोकांना थकवा आणि आळस येतो.
मोठ्या प्रमाणात लोक या दिवसांमध्ये थंडी असल्यामुळे जिममध्ये जाणे टाळतात. त्यामुळे देखील झोप आणि आळस येतो.
थंडीच्या दिवसांमध्ये लोक गरम पदार्थ खातात. त्यामुळे आळस येतो. या दिवसांमध्ये कार्बोहाइड्रेट युक्त आहार घ्यावा.
तसेच हिवाळ्यातील लहान दिवस सर्कॅडियन लयवर परिणाम करत असतात. हे झोप आणि जागृत होण्याचे चक्र नियंत्रित करते. त्यामुळे अनेकांना दिवसभर झोप लागते.