टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिनची डिलीव्हरी खाकी रंगाच्या बॉक्समध्ये होते, हे तुम्ही पाहिले असेल.
या खाकी बॉक्सला कार्डबोर्ड बॉक्स किंवा कार्टून बॉक्सदेखील म्हटलं जातं.
कार्डबोर्ड बॉक्सवर तुम्ही छत्रीचे चिन्हा पाहिले असेल.
याचा अर्थ तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला पश्चातापाची वेळ येऊ शकते.
हे चिन्ह बॉक्सवर का असतं? याचा उपयोग काय होतो? सर्वकाही जाणून घेऊया.
कार्डबोर्ड बॉक्सवर खूप चिन्ह असतात, ज्याचा काही ना काही अर्थ असतो.
कार्डबोर्ड बॉक्सवरील छत्रीचं चिन्ह कोरड असल्याचे दर्शवते.
बॉक्सच्या आतील वस्तूला ओलावा पोहोचू नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले जाते.
कार्डबॉक्सवरील चिन्ह डिलीव्हरी बॉयपासून ग्राहकांपर्यंत सर्वांना सूचित करत असते.