प्रत्येक वर्षी 5 सप्टेंबर रोजी भारतात शिक्षक दिवस साजरा केला जातो या दिवशी भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असतो.
डॉ. राधाकृष्णन हे महान शिक्षणतज्ञ आणि तत्त्वज्ञ होते. त्यांची शिक्षण क्षेत्रात महत्वाचे योगदान दिले होते. शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थी आणि शिक्षकांप्रती कृतज्ञता आणि सन्मानभाव व्यक्त करतात.
शिक्षक हे समाजाचे स्तंभ असतात जे विद्यार्थ्यांना ज्ञानवान बनवण्याचे आणि एक जबाबदार व्यक्ती बनवण्याचे कार्य करतात. शिक्षक अथक परिश्रम करून विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देतात आणि त्यांना यशाची प्रेरणा देतात.
5 सप्टेंबर हा शिक्षक दिन आहे, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना आदरांजली वाहण्याचा आणि शिक्षकांच्या योगदानाचे स्मरण करण्याचा दिवस.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 मध्ये तामिळनाडू येथे झाला होता. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे प्रसिद्ध लेखक, शिक्षक, राजकीय नेते होते. त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न प्रदान करण्यात आला होता.
शिक्षक दिनानिमित्त शाळा, कॉलेजमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. विद्यार्थी यादिवशी आपल्या शिक्षकांना भेटवस्तू सुद्धा देतात.
शिक्षक दिन हा केवळ शिक्षकांचा सन्मान करण्याचा दिवस नाही तर त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे स्मरण आणि आभार मानण्याचा दिवस आहे.