सध्या कपड्यांची फॅशन ही सतत बदलत असते. दर महिन्याला कपड्यांचे नवनवीन ट्रेंड मार्केट गाजवतात.
पण अद्याप शर्टची फॅशन काही कमी झालेली नाही. सध्या पुरुष आणि स्त्रिया हे दोघे शर्ट घालतात, परंतु त्यांच्या शर्टचा पॅटन सारखा दिसत असला तरी त्यांच्या बटणांमध्ये मात्र मोठा फरक असतो.
महिलांच्या शर्टची बटण ही शक्यतो डाव्या बाजूला आणि पुरुषांच्या शर्टाची बटण ही उजव्या बाजूला असतात. मात्र तसे का असते याबाबत कोरा या साईटवर काही यूजर्सनी उत्तर दिली आहेत.
बऱ्याचदा महिला बाळांना दूध पाजताना त्यांना डाव्या हाताने पकडतात जेणेकरून उजव्या हाताने ते आपले कपडे सांभाळू शकतात. महिलांना सोईस्कर पडावं म्हणून शर्टाची बटण ही डाव्या बाजूला लावायला सुरुवात झाली असावी.
पूर्वी पुरुष लढाईला जायचे त्यावेळी ते हातात तलवार पकडायचे, अशावेळी त्यांना सोयीस्कर पडावं म्हणून त्यांनी उजव्या बाजूला बटण लावायला सुरुवात केली.
सुरुवातीला महिलांच्या शर्टाची फॅशन आली तेव्हा केवळ श्रीमंत महिलाच शर्ट घालायच्या. मात्र अशा महिलांना तयार करण्यासाठी मदतनीस असायच्या त्यांना उजव्या हाताने बटण लावणं सोपं पडावं म्हणून महिलांच्या शर्टाची बटण ही डाव्या बाजूला असायची.
कोरावर एका युजरने लिहिले की, फ्रांसचा सम्राट नेपोलियन याला शर्टाच्या उजव्या बाजूस हात घालून वावरण्याची सवय होती. तेव्हा त्याच्या प्रमाणे महिलांनी देखील उजव्या बाजूला बटण शिवायला सुरुवात केली. मात्र नेपोलियनने एक आदेश काढला त्यानंतर महिला उजव्या बाजूला बटण लावायला लागल्या.
सदर माहिती ही एक सामान्य माहिती असून याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. संबंधित माहितीसाठी झी 24 तास जबाबदार नसेल