सुधा मूर्ती यांनी पालकत्वाच्या काही टिप्स दिल्या आहेत. वयात येणाऱ्या मुलांना योग्य संस्कार देण्यासाठी त्यांच्या या टिप्स तुम्हाला खूप उपयोगी पडतील.
मुलांवर तुमच्या इच्छा लादू नका. सतत त्यांच्या अवतीभोवती राहू नका. त्यांना त्यांचा मोकळा वेळ द्या
मुलांना घडवण्यासाठी त्यांच्यासमोर एखादं ध्येय ठेवा. एखाद्या थोर व्यक्तीची उदाहरण ठेवून त्यांना सतत प्रोत्साहन करा
मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी जीवनशैलीत सुधारा. साधं राहणीमान असेल तर मुलदेखील छोट्या छोट्या गोष्टीत हट्ट धरणार नाहीत
पौंगडावस्थेत असताना मुलं सतत स्वतःची तुलना करतात. मात्र, अशावेळी तुम्हीच मुलांना सतत प्रोत्साहन द्या. त्यांच्या कामाचे कौतुक करा
मुलांना सतत सूचना देण्यापेक्षा कधीकधी त्यांची मतेदेखील ऐकून घ्या. त्यांना मोकळेपणाने बोलू द्या
मुलांना मोठ्या व्यक्तींचा सन्मान करणे त्यांना मान देणे शिकवा. घरातील काम करणाऱ्या व्यक्तींचाही आदर करणे शिकवावे