आयत्या वेळी सुट्टीचा बेत आखताय?

आयत्या वेळी सुट्टीचा बेत आखताय? 2 दिवसांत फिरून या महाराष्ट्रातील 'हे' हिलस्टेशन

पाचगणी

नेहमीच्या महाबळेश्वरला न जाता तुम्ही त्याआधी येणाऱ्या पाचगणीमध्येही सहज पोहोचू शकता. मुंबईपासून 4 आणि पुण्यापासून 3 तासांच्या अंतरावर हे गिरीस्थान आहे.

तोरणमाळ

सापुतारा पर्वतरांगांचं सौंदर्य अनुभवायचं असल्यास तुम्ही तोरणमाळला भेट देऊ शकता.

भीमाशंकर

समुद्रसपाटीपासून 3200 फूटांच्या उंचीवर असणाऱ्या भीमाशंकर परिसरामध्ये तुम्ही किमान वेळात पोहोचू शकता. शंकराच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर तुम्ही इथल्या निसर्गसौंदर्याचा आनंद लुटू शकता.

कोरोली

महाराष्ट्रातील एक कमी गर्दीचं हिलस्टेशन म्हणजे कोरोली. इथं पोहोचून तुम्ही शहरी जीवनापासून फार दूर येता.

आंबोली घाट

थोडं दूर जायचं झाल्यास दाट धुक्यात हरवणाऱ्या आंबोली घाट आणि परिसरातही तुम्ही दोन ते तीन दिवसांच्या सुट्टीचा आनंद घेऊ शकता.

माळशेज

ठाणे, मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या माळशेजलाही तुम्ही भेट देऊ शकता. इथं नजीकच तुम्ही लेण्याद्री, शिवनेरी किल्ल्यावरही जाऊ शकता.

VIEW ALL

Read Next Story