रविवार, सोमवार... नाही तर शिवरायांच्या काळात अशी होती आठवड्याच्या 7 दिवसांची नावं

वारांसाठी अगदी वेगळीच नावं वापरली जायची

आज आपण ज्याप्रमाणे रविवार, सोमवार अशी दिवसांची नावं वापरतो. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अगदीच वेगळी नावं वापरली जायची. याचबद्दल जाणून घेऊयात...

कोणत्या दिवसाला काय नाव?

दैनंदिन नोंदी, पत्रव्यवहार, आर्थिक व्यवहारांच्या नोंदी यासाठी शिवकालीन तपशीलामध्येही दिवसांचा उल्लेख आवर्जून केला जायचा. त्यावेळी कोणत्या दिवसाला काय म्हणाले पाहूयात...

रविवारचं नाव काय होतं?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुट्टीच्या दिवसाला आदित्यवार म्हणायचे. संडे, रविवार आणि आदित्यवार या सर्वांचं कनेक्शन सूर्याच्या नावांशीच आहे.

सोमवारचं चंद्र कनेक्शन

पूर्वी सोमवारचं नाव चंद्रावरुन ठेवलेलं होतं. या दिवसाला चंद्रवार अथवा इंदूवार असं म्हणायचे. हा दिवस चंद्राचा मानला जात असल्याने त्यावरुन नाव ठेवण्यात आलेलं.

मंगळवारला काय म्हणायचे?

मंगळवार हा गणरायाचा वार म्हणून समजला जातो. त्यामुळे या दिवसाला भौमवार म्हणून ओळखलं जायचं.

बुधवारचं नाव फारच वेगळं

पूर्वी बुधवारची ओळख सौम्यवार अशी होती. कालांतराने या दिवसाला बुधवार हे नाव पडलं.

गुरुवारचं नाव हिंदीत आजही तेच

गुरुवारला पूर्वी बृहस्पतवार असं म्हटलं जायचं.

शुक्रवारला होतं 'हे' नाव

शिवकालीन पत्रव्यवहारामध्ये शुक्रवारचा उल्लेख भृगुवार अशी आढळून येते.

शनिवारचं नाव काय?

शनिवारचा उल्लेख स्थिरवार अथवा मंदवार असा केला जायचा.

सोशल मीडियावर व्हायरल

सदर माहिती 'गोल्डन हिस्ट्री ऑफ मराठा' या सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे.

VIEW ALL

Read Next Story