मंगळवारी म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी बाप्पााला वाजत-गाजत निरोप देण्यात येणार आहे. अनंत चतुर्दशीला मुंबईत भक्तांची मोठी गर्दी उसळते.
बाप्पााच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी दूरुन दुरून भाविक येतात. रात्री बाप्पााच्या दर्शनासाठीही भाविक येतात
रात्री गणपतीच्या दर्शनासाठी बाहेर पडणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वे रात्री २२ विशेष उपनगरी लोकल सोडणार आहे. १४ ते १८ सप्टेंबर दरम्यान विशेष लोकल सोडण्यात येतील.
सीएसएमटी ते कल्याण मार्गावर ०१:४०, ०२:३०, ०३:२५ या दरम्यान लोकल सेवा उपलब्ध
कल्याण-सीएसएमटी मार्गावर - 12:०५च्या दरम्यान लोकल सेवा उपलब्ध असणार आहेत.
सीएसएमटी- ठाणे या मार्गावर ०१.०० तर ठाणे - सीएसएमटी- ०२,०० दरम्यान लोकल उपलब्ध असेल
विसर्जनाच्या दिवशी हार्बर सेवा सीएसएमटी- पनवेल ०१:३०, ०२:४५ दरम्यान असणार आहे.
पनवेल-सीएसएमटी लोकलसेवा रात्री ०१:००, ०१:४५ वाजता लोकल सुटणार आहेत