पुण्यात अचानक वाढला गारठा; तापमानात 10 अंशांनी घट

May 29,2024

पुणे

पुण्यातील हवामानाचा पुणेकरांना भलताच अभिमान आणि तो असावाही. कारण, पुण्यात येणारा प्रत्येकजण इथल्या वातावरणानं आणि हवामानानं भारावून जातो. गेल्या काही वर्षांमध्ये मात्र याच पुण्यात उष्णता प्रचंड वाढल्याचं पाहायला मिळालं होतं. मागील काही दिवसांपासून इथं तापमानही 41 अंशांपर्यंत पोहोचलं होतं.

तापमानात मोठे बदल

इथं जीवाची काहिली होत असतानाच एका रात्रीत पुण्याच्या तापमानात मोठे बदल झाले असून, एकाएकी इथं गारठा पडण्यास सुरुवात झाली आहे. बुधवार (29 मे 2024) रोजी पुण्यात तापमान 41 अंशांवरून थेट 30 अंशांवर पोहोचल्याचं पाहायला मिळालं.

रेमल

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार मागील 48 तासांपासून पुण्यातील हवामान अतिशय झपाट्यानं बदललं. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळं हे बदल झाल्याचं म्हटलं जात आहे. त्याशिवाय रेमल चक्रिवादळामुळंही इथं परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे.

हवामान

रेमलचे महाराष्ट्राच्या हवामानावर थेट परिणाम दिसून आले नाहीत. पण पुण्यातील गारठा हा, त्याच परिणामांचा एक भाग असल्याचं सांगितलं जात आहे. मुख्य म्हणजे हवामान कितीही अल्हाददायक झालं असलं तरीही त्यात क्षणोक्षणी होणारे बदल मात्र चिंता वाढवत आहेत.

बांधकाम

शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात होणारं बांधकाम, भूजलपातळीत होणारी घट, वाहनांच्या संख्येत होणारी वाढ आणि ओघाओघानं होणारा पर्यावरणाचा ऱ्हास या सर्व गोष्टींचे परिणाम येत्या काळात मानवी जीवनावर होणार असून ही त्याचीच सुरुवात सांगितली जात आहे.

तापमानातील घट

पुण्यात सध्या झालेली तापमानातील घट कितीही हवीहवीशी असली तरीही ती किती काळासाठी टीकून राहिल याची काहीच शाश्वती नसल्याचंही स्पष्ट करण्यात येत आहे.

VIEW ALL

Read Next Story