भारतात अशी एक रेल्वे आहे जी अजूनही ब्रिटिशांच्या ताब्यात आहे.
महाराष्ट्रात एक असा रेल्वे ट्रॅक आहे ज्याचे अधिकार ब्रिटनच्या एका खासगी कंपनीकडे आहेत.
1952 मध्ये भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले मात्र हा रेल्वे ट्रॅक काही भारताला स्वतःच्या अखत्यारित घेता आला नाही
ब्रिटनच्या क्लिक निक्सन अँड कंपनीच्या भारतीय युनिट सेंट्रल प्रोव्हिन्सेस रेल्वे कंपनीला या रेल्वे ट्रॅकसाठी करोडो रुपयांची रॉयल्टी द्यावी लागते
शकुंतला एक्स्प्रेस या नावाने या रेल्वे ट्रॅकला ओळखले जाते.
महाराष्ट्रातील यवतमाळ-मूर्तिजापूर-अचलपूर या मार्गावर धीम्या गतीने ही एक्स्प्रेस धावत होती.
या रेल्वे मार्गावर सिग्नलदेखील ब्रिटिशकालीन असून यावर मेड इन लिव्हरपूल असा उल्लेख आढळतो. गाडीचे वाफेचे इंजिनही मँचेस्टर येथे बनवले होते
1923 पासून सलग 70 वर्षे ते सेवेत होते. त्यानंतर मात्र रेल्वेचा वेग कमी असल्यामुळं ती बंद करण्यात आली
शकुंतला रेल्वे अनेक वर्ष वऱ्हाडवासियांची लाइफलाइन होती
औद्योगिक व्यवसायाला चालना देण्यासाठी ब्रिटिशांनी रेल्वे सेवा सुरू केली होती.