राज्यसभेचे खासदार शरद पवार हे सध्या हिवाळी अधिवेशनानिमित्त दिल्लीत आहेत.
शरद पवारांनी आज दिल्लीमध्ये उपराष्ट्रपती जगदीप धनकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.
पंतप्रधान मोदींबरोबर शरद पवारांनी शेतकऱ्यांसंदर्भातील मुद्द्यावर चर्चा केल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.
या भेटीत पवारांनी पंतप्रधान मोदींना डाळिंबं भेट दिली.
शरद पवारांनी उपराष्ट्रपती जगदीप धनकरांनाही डाळिंबं भेट दिली.
मात्र पवारांनी डाळिंबं भेट देण्यामागे विशेष कारण आहे. हे कारण म्हणजे महाराष्ट्रातील शेतकरी.
सातारा आणि फलटणमधील दोन शेतकऱ्यांसोबत पवार उपराष्ट्रपतींना भेटले.
या शेतकऱ्यांनीच ही डाळिंबं आणली होती. त्यामुळेच पवारांनी ही अनोखी भेट बड्या नेत्यांना दिली.