Best Misal Pav in Mumbai: जगात भारी "मिसळ पाव" मुंबईत कुठे मिळतो? जाणून घ्या 7 ठिकाणे..

महाराष्ट्राचा 'मिसळ पाव' जगात भारी...

नुकतीच TasteAtlas या फूड गाइड प्लॅटफॉर्मने जगातील सर्वोत्कृष्ट 'शाकाहारी पदार्थ' ची यादी जाहीर केली आहे. या मध्ये महाराष्ट्राच्या 'मिसळ पाव' ने जगात ११ वा क्रमांक पटकावला आहे. चला तर मग जाणून घेऊ, मुंबई मध्ये सर्वात भारी मिसळ पाव कुठे मिळतो.

1.आस्वाद उपहार & मिठाई गृह

आस्वादच्या मिसळ पाव ला जगातील सर्वात चवदार शाकाहारी पदार्थ म्हणून 2015 मध्ये लंडनच्या फूडी हब ग्लोबल अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले होते. ही मिसळ मध्यम मसालेदार आहे. पत्ता - संस्कृती बिल्डिंग गडकरी चौक, ४, लेडी जमशेदजी रोड, समोर. शिवसेना भवन, दादर पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र 400028

2. मामलेदार मिसळ

ठाण्यातील लज्जतदार मामलेदार मिसळ यांनीही मुंबईत अनेक आऊटलेट्स उघडली आहेत. ते सर्वोत्तम अस्सल आणि विशेषतः मसालेदार मिसळ देतात. कमी किमतीत तुम्ही चविष्ट मिसळपाव चा आनंद इथे घेऊ शकतात. पत्ता- कांजूरमार्ग – विंग ए, लाल बहादूर शास्त्री रोड, लक्ष्मी उद्योग नगर, कांजूरमार्ग वेस्ट, भांडुप वेस्ट, मुंबई, महाराष्ट्र 400078

3. आराम रेस्टॉरंट

मुंबई च्या सीएसएमटी स्टेशनच्या समोरील 'आराम' रेस्टॉरंट आहे. गेल्या हे आठ दशकांहून अधिक जुने रेस्टॉरंट आहे. जागा लहान, स्वच्छ आणि नीटनेटकी आहे. दही मिसळ ही आरामची खासियत आहे. पत्ता- कॅपिटल सिनेमा बिल्डिंग, 126, डॉ. दादाभाई नौरोजी रोड, आझाद मैदान, फोर्ट, मुंबई-400001.

4. मामा काणेचा स्वच्छ उपहार गृह

दर स्टेशनजवळ 'मामा काणे यांचे स्वच्छ उपहार गृह' हे 110 जुने रेस्टॉरंट आहे जे आपल्या घरगुती महाराष्ट्रीयन पदार्थांसाठी ओळखले जाते. इथली मिसळपाव पण त्याच्या मसालेदार चवीसाठी ओळखला जातो. पत्ता- 222, स्मृती कुंज, सेनापती बापट मार्ग, दादर (प), मुंबई- 400028.

5. विनय हेल्थ होम

हे सुद्धा मुंबईतील एक जुने रेस्टॉरंट आहे. अनेक दशकांपासून उत्तमोत्तम महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ देत आहे. या रेस्टॉरंटमध्ये पुणेरी मिसळ, स्पेशल मिसळ, दही मिसळ इत्यादी विविध प्रकारच्या मिसळ मिळतात. पत्ता- जवाहर हवेली, 71/83, ठाकूरद्वार, डॉ. बाबासाहेब जयकर मार्ग, फणस वाडी नाका, मुंबई- 400002.

6. पणशीकर स्वीट्स & स्नॅक्स

उत्तम चवीसह उत्तम दर्जाच्या महाराष्ट्रीयन पदार्थासाठी पणशीकर स्वीट्स & स्नॅक्स प्रसिद्ध आहेत. उपवासाच्या दिवशी तुम्ही येथे फराली मिसळ चा आस्वाद घेऊ शकता. पत्ता- 5, कदमगिरी कॉम्प्लेक्स, हनुमान रोड, विलेपार्ले (ई), मुंबई- 400057.

7.भट्ट विश्रांती गृह

जर तुम्हाला मसालेदार मिसळ आवडत असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी आहे. सायन – ट्रॉम्बे रोडवरील चेंबूर नाका येथे आहे. पत्ता- MTNL टेलिफोन एक्सचेंज समोर, चेंबूर नाका, सायन - ट्रॉम्बे रोड, चेंबूर, मुंबई, महाराष्ट्र 400071

VIEW ALL

Read Next Story