अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या विवाहसोहळ्यात येणाऱ्या पाहुण्यांना कोट्यवधींच्या भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. यामध्ये VVIP पाहुण्यांना महागडी घड्याळं दिली जाणार आहेत.
काश्मीर, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश अशा विविध राज्यांत तयार करण्यात आलेली काही स्थानिक उत्पादनंसुद्धा रिटर्न गिफ्ट म्हणून दिली जाणार आहेत.
स्वदेश ऑर्गनायजेशनला ही जबाबदारी सोपवण्यात आली असून, गेल्या 4 महिन्यांपासून या रिटर्न गिफ्टची जुळवाजुळव सुरु असल्याचं पाहायला मिळालं आहे.
बांधणीच्या ओढण्या, साड्या, बनारसी कापडापासून तयार करण्यात आलेल्या बॅगा, जंगल ट्रेंडच्या साड्यांचा यामध्ये समावेश आहे.
सुरेख नक्षीकाम असणाऱ्या चांदीच्या मूर्ती, खास तेलंगणातील करीमनगर येथील कारागिरांकडून मागवण्यात आल्या आहेत.
लुई विटॉनची बॅग, सोनसाखळी, खास मेणबत्त्या आणि डिझायनर फुटवेअर अशी भेटवस्तूंची बरसात अंबानींच्या लेकाच्या विवाहसोहळ्यात केली जाणार आहे.