मुंबईत नेहमीच महागडे फ्लॅट विकल्या जात असल्याच्या बातम्या आपण रोजच ऐकत असतो. नुकताच मुंबईत आणखी एक महागड्या पेंटहाऊसचा करार झाला आहे. ज्याची किंमत जवळपास 116 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

Jan 13,2024


हे 116 कोटींचे पेंटहाऊस फॅशन डिझायनर वर्तिका गुप्ता यांनी विकत घेतले आहे. होम डेकोरेशन कंपनी मेसन सियाच्या सीईओ वर्तिका गुप्ता यांच्या या घराची आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे.


वर्तिकाने मुंबईतील वरळी भागात सी फेसिंग घर विकत घेतले आहे. गुप्ता यांनी 'ओबेरॉय 360 वेस्ट'मध्ये हे घर विकत घेतले आहे. ही तीच इमारत आहे जिथे याआधी देशातील सर्वात महागडे फ्लॅट विकले गेले होते.


याशिवाय या इमारतीत डी-मार्टचे प्रमुख राधाकृष्ण दमानी, शाहिद कपूर, अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचे पेंटहाऊस आहेत.


नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी आणि पर्ल अकॅडमी ऑफ फॅशनच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या वर्तिका गुप्ता यांनी अंजुमन फॅशन लिमिटेडमध्ये परिधान डिझायनर म्हणून फॅशनच्या जगात तिच्या करिअरची सुरुवात केली.


वर्तिका गुप्ता 2011 ते 2016 या काळात टू व्हाईट बर्ड्सच्या डिझाईन डायरेक्टर होत्या. 2017 मध्ये, त्यांनी पतीसोबत उद्योजकतेच्या जगात प्रवेश केला. नकुल अग्रवाल असे त्यांच्या पतीचे नाव आहे.


वर्तिका गुप्ता या मेसन सिया कंपनीच्या सीईओ आहेत. ही कंपनी घरांसाठी सजावटीच्या वस्तू बनवण्याचे काम करते. वर्तिकाकडे Royals Royce Cullinan Black Badge SUV आहे. या कारची किंमत 12.25 कोटी रुपये आहे.

VIEW ALL

Read Next Story