सर्वात महागडा घटस्फोटसाठी सध्या देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांची चर्चा होतेय.
गौतम सिंघानिया यांच्या मालमत्तेतील 75 टक्के वाटा पत्नी नवाज मोदी यांनी मागितला आहे. 8745 कोटी रुपयांची मागणी नवाज मोदी यांनी केली आहे.
या घटस्फोटाचं कारण आणि वैवाहिक आयुष्यातील भीतीदायक वास्तव खुद्द नवाज मोदी यांनी सांगिलतं आहे. सिंघानियाने आपला शारीरिक छळ केला असा आरोप पत्नी नवाज मोदी यांनी केला आहे. नीता अंबानी नसत्या तर त्यांचा जीव वाचला नसता.
मुंबईतील घरात 10 सप्टेंबरला वाढदिवसाच्या पार्टीनंतर पत्नी नवाज आणि त्यांची अल्पवयीन मुलगी निहारिकाला गौतम यांनी मारहाण केली, असा आरोप नवाज मोदी यांनी केला आहे. त्यावेळी गौतमपासून वाचण्यासाठी एका रुमचा आधार घेतला.
त्यानंतर वाढदिवसाच्या पार्टीत असेलल्या लोकांना आम्ही मदतीसाठी फोन केले. त्यावेळी मी माझी मैत्रीण अनन्या गोयनकाला फोन केला. तर माझ्या मुलीने तिचा मित्र विश्वरुपला फोन केला. विश्वरुपणहा त्रिशकर बजाजचा मुलगा असून त्रिशकर हा गौतमचा चुलत भाऊ आहे.
निहारिकाने विश्वरुपला सांगितलं की, त्रिशाकर बजाजला गौतम यांच्यासोबत बोलण्यासाठी घेऊन जा. नीता अंबानी आणि अनंत अंबानी पूर्ण वेळ माझ्यासोबत फोनवर होते. माझं पूर्ण कुटुंब त्यावेळी आमच्या मदतीसाठी धावून आलं होतं.
मारहाण करताना गौतम निहारिका म्हणत होते, पोलीस तुमच्या मदतीला येणार नाही. सगळे माझ्या खिशात आहेत. गौतम यांनी पोलीस येऊ नये साठी पूर्ण प्रयत्न केला. पण नीता आणि अनंत अंबानी यांनी पोलीस बोलवण्यासाठी आग्रही होते.
अंबानींच्या सांगण्यावरून पोलिसांनी गौतम यांचे सर्व प्रयत्न धुडकावून लावले. त्याशिवाय नॉन कॉग्निझेबल गुन्ह्याची नोंदही केली. तर नवाज मोदींच्या आरोपाचं गौतम यांनी खंडन केलंय.
नीता अंबानी आणि अनंत अंबानी यांच्यामुळे आमचा जीव वाचला आणि 14 नोव्हेंबरला नवाज यांनी घटस्फोटाची घोषणा केली आणि 32 वर्षांचं वैवाहिक जीवन संपुष्टात आला.