आजच्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये तब्बल 13 नेते असे आहेत की जे मुख्यमंत्री आहेत किंवा होते. हे नेते कोण पाहूयात...
आज मुंबईमध्ये I.N.D.I.A आघाडीची तिसरी बैठक आहे. सत्ताधारी मोदी सरकारविरोधातील या आघाडीच्या बैठकीत 60 हून अधिक नेते सहभागी होणार आहेत.
I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीमध्ये सहभागी होणाऱ्यांपैकी तब्बल 13 नेते हे वेगवेगळ्या राज्यांचे आजी-माजी मुख्यमंत्री आहेत.
13 पैकी 6 CM हे आजच्या घडीला राज्यातील 6 वेगवेगळ्या राज्यांचं नेतृत्व करत आहेत. पाहूयात ही यादी सविस्तरपणे...
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईमधील सभेचे यजमान आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सभेच्या एक दिवस आधीच मुंबईत आल्यात.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री ए. के. स्टॅलिनही या सभेसाठी मुंबईत दाखल झालेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही I.N.D.I.A च्या बैठकीला हजेरी लावणार आहेत.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही या बैठकीसाठी मुंबईत आलेत.
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादवही मुंबईत दाखल झालेत.
झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेनही या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवारही या बैठकीला उपस्थित आहेत.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादवही या बैठकीसाठी आले आहेत.
जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री फारुख अबदुल्ला या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
तसेच जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अबदुल्लाही या बैठकीला हजर राहणार आहेत.
जम्मू-काश्मीरमधील पीडीपीच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तीही या बैठकीला हजर आहेत.