लष्कर पंजाब स्वीट हाऊस (Lashkar By Punjab Sweet House, Bandra) य़ेथे दोन लोक 800 रुपयात छोले भटुरेचा आनंद घेऊ शकता. सकाळी 11 ते रात्री 11 पर्यंत हे हॉटेल चालू असतं.
ओये केक, फोर्ट (Oye Kake, Fort) हे हॉटेल खिशासाठी थोडं महाग असू शकतं. 600 रुपयांत दोघेजण येथे खाऊ शकतात. सकाळी 11 ते दुपारी 4 PM आणि संध्याकाळी 7 ते रात्री 11:30 पर्यंत हे चालू असतं.
गुलाटी स्वीट्स, अंधेरी पूर्व (Gulati’s Sweets, Andheri East) गेल्या दोन दशकांपासून हे ठिकाण प्रसिद्ध असून अगदी पंजाबी चवीचे छोले भटूरे मिळतात.
व्हीआयजी, चेंबूर (VIG, Chembur) हे ठिकाण प्रसिद्ध असून स्थानिकांना विचारलंत ते तुम्हाला सांगतील.
गुरु कृपा, सायन (Guru Kripa, Sion) 41 वर्षीय जुन्या हॉटेलमधील छोले-समोसा खवय्यांची आवडती डिश आहे.
सायनमधील चावला (Chawla’s, Sion), सायन कोळीवाड्यातील हे ठिकाणा चांगलंच प्रसिद्ध आहे. सकाळी 7.30 ते रात्री 11 वाजेपर्यंत हे हॉटेल चालू असतं.