लग्नामध्ये आपण सुंदर दिसावं असं प्रत्येक नवं वधू-वराला वाटत असतं.
लग्नात कोणती साडी नेसावी त्यावर कोणता लुक करावा,मेकअप काय करायचा या सगळ्याची नवरी मुलगी तयारी करून ठेवते.
पण नवऱ्या मुलाचं असं काही सहसा अगोदर ठरलेलं दिसून येत नाही.
नवरदेवानसुद्धा आपला स्वतःचा लुक हा लग्नाच्या 5 ते 10 दिवस अगोदर ठरवला पाहिजे.
नाहीतर मग ऐन वेळी तुमचा लुक बिघडू शकतो.
जर तुम्ही या टिप्स नुसार तयारीला लागलात तर तुमचा लुक लग्नात नक्कीच उठून दिसेल.
लग्नाच्या एक दोन दिवस अगोदर क्लीन शेव बिअर्ड लुक किंवा हेअर स्टाईल मध्ये नवीन प्रयोग करू नका.
तुम्ही अचानक नवीन लूक केलात तर कदाचित तो तुमच्या चेहऱ्याला सुट करणार नाही.म्हणून लग्नाच्या 7-8 दिवस अगोदर नवीन लुक तरी करून बघा.
मुलांनीसुद्धा आपल्या चेहऱ्याची काळजी घेणं गरजेचं आहे. लग्नाच्या दोन ते तीन दिवस अगोदर फेशिअल करावं.
नखांना नेलपॉलिश जरी लावत नसलो तरीही मॅनिक्युअर आणि पेडीक्योर करणं गरजेचं आहे.
शरीरावरील केसांचे वॅक्स करणं गरजेचं आहे जर तुम्ही वॅक्स करू शकणार नसाल तर ट्रिम करू शकता.
लग्नाच्या दिवशी बेसिक मेकअप करणं गजेंचं आहे. मुलांचा जास्त हेवी मेकअप नसतो त्यांनी बेसिक मेकअप निदान या दिवशी करणं गरजेचं आहे.