पती पत्नीचं नातं हे प्रेम आणि विश्वासावर टिकून असतं.
प्रेम आणि विश्वास जपत असताना एकमेकांची खंबीरपणे साथ देणे देखील गरजेचे असते.
स्त्रिया ह्या हळव्या असतात. तर, पुरुष तितकेच धीराचे असतात.
तु मुलगा आहेस. मुलांनी रडायचं नसतं असं मुलांना लहानपणापासून सांगितले जाते.
यामुळे रडणाऱ्या पुरुषांना कमजोर मानले जाते.
पत्नी ही आयुष्याची जोडीदार असते. यामुळे पत्नी समोर रडल्यास पुरुषांचे मन हलके होते.
पुरुषांनी आपलं रडण रोखून धरल्यास त्यांच्या मनात भावना दबून राहतात. तसेच डिप्रेशन देखील येवू शकते.