आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्रात काही चुकांबद्दल लिहून ठेवलं आहे. ज्यामुळं व्यक्तीला अर्थिक अडचणी येतात
आचार्य चाणक्य म्हणतात की या चुका करणारा व्यक्ती कधीच धनवान होत नाही. घरातील सुखही निघून जाते
व्यक्तीला कधीच पैशांची घमेंड नसावी. अहंकार व्यक्तीला कंगाल करतो.जो व्यक्ती पैशांचा घमेंड करतो त्याच्यावर लक्ष्मी नाराज होते.
व्यक्तीने कधीच निरर्थक खर्च करु नये. अतिरिक्त खर्च व्यक्तीला बरबाद करतो. जो व्यक्ती कोणतंही कारण नसताना खर्च करतो त्याच्या खिशात कधीच पैसा टिकत नाही
तसंच, जो व्यक्ती अतिप्रमाणात कंजूसी करत असेल तर त्याची आर्थिक स्थिती ढासळते
आळशी व्यक्तीची आर्थिक परिस्थितीही नेहमी हलाकीची असते. त्याच्या हातात कधीच पैसे टिकत नाहीत
जो व्यक्ती आळस करत असेल तर त्यावर देवी लक्ष्मी नाराज होते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)