चाणक्य यांनी यासंदर्भातील उल्लेख एका श्लोकामध्ये केला आहे. ते काय म्हणाले आहेत पाहूयात...
चाणक्य म्हणतात की कोणतीही व्यक्ती तिच्या कर्मामुळे दु:ख आणि सुखाचा उपभोग घेत असते.
व्यक्तीला जे चांगले वाईट भोग भोगावे लागतात त्यामागील कर्म आताच्या जन्माचंही असू शकतं किंवा मागच्या जन्माचंही असू शकतं असं चाणक्य सांगतात.
चाणक्य नीतिच्या 13 व्या अध्यायामधील 15 वा श्लोक मानवाच्या अशा सवयींबद्दल सांगतो ज्यामुळे केलेल्या कामामध्येही अडचणी निर्माण होतात.
यात अशा एका समस्येबद्दल चाणक्य यांनी सांगितलं आहे की, ज्यावर ताबा मिळवला तर संकटामध्येही सुखाचा उपभोग घेता येतो.
मात्र याच गोष्टीने एखाद्या व्यक्तीवर ताबा मिळवला तर यश तिच्यापासून फार दूर जातं असं चाणक्य सांगतात.
अनवस्थितकायस्य न जने न वने सुखम्। जनो दहति संसर्गाद् वनं सगविवर्जनात॥ हाच तो चाणक्य यांचा श्लोक.
या श्लोकामध्ये चाणक्य यांनी सर्व समस्येंमागील मूळ कारण हे व्यक्तीचं मन हे असतं.
कोणत्याही व्यक्तीचं मन म्हणजेच चित्त हे त्याच्या ताब्यात नसेल तर कितीही सुख आणि संपत्ती असली तरी ती व्यक्ती समाधानी नसते, असं चाणक्य म्हणतात.
मन स्थिर नसेल तर कितीही सुविधा आणि सुख पायाशी लोळण घेत असलं तरी ती व्यक्ती त्रासलेली असते. अशा लोकांची नियोजित कामही अडतात, असं चाणक्य सांगतात.
ज्यांच्याकडे मनावर ताबा मिळवण्याची क्षमता नसते असे लोक संपूर्ण कुटुंब एकत्र असलं तरी समाधानी नसतात आणि एकटे असले तरी समाधानी नसतात, असं चाणक्य म्हणतात.
Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.