आपण अनेकदा पाकिट किंवा पर्समध्ये अशा अनेक गोष्टी ठेवतो ज्यांची आपल्याला गरज नसते. पण पर्समध्ये कोणतीही गोष्ट ठेवणं योग्य नाही.
वास्तुशास्त्रानुसार, पाकिटात अनावश्यक गोष्टी ठेवल्याने वास्तुदोष होतो आणि यामुळे आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागतो.
अनेकदा लोक खर्चांची बिलं आपल्या पाकिटात ठेवतात. पण वास्तुशास्त्रानुसार, हे आर्थिक हानीचं मोठं कारण असल्याचं सांगण्यात आलं आहे.
आपल्या पाकिटात इलेक्ट्रिसिटी किंवा फूड बिल, प्रवासाची तिकिटं ठेवू नका. आपल्या खर्चाची यादीही पर्समध्ये ठेवू नका.
पाकिटात अनेकजण देवाचा फोटो ठेवतात, पण हे योग्य नाही. पाकिट हे चमड्यापासून तयार केलेलं असतं त्यामुळे त्यात देवाचा फोटो ठेवणं उचित नाही.
काही लोक पाकिटात कपाट किंवा घराची चावी ठेवतात. वास्तुनुसार, पाकिटात लोखंडाची वस्तू ठेवल्याने नकारात्मकता पसरते आणि आर्थिक नुकसान होतं.
अनेक लोक घनिष्ठ नातं किंवा आठवणीत मृत व्यक्तीचा फोटो पाकिटात ठेवतात. पण असं केल्यानेही वास्तुदोष लागतो.
पाकिटात पैसे नेहमी क्रमाने ठेवा. म्हणजे आधी मोठ्या नोटा आणि नंतर छोट्या नोटा. पाकिटात नोटा कशाही पद्धतीने चुरघळून वैगेरे न ठेवता व्यवस्थित ठेवा.