आणता येणार नाही? करा 'हे' उपाय
लवकरच लाडके बाप्पा घरोघरी विराजमान होणार आहे. कोणाकडे अडीच दिवस, तर कोणाकडे पाच तर कोणाकडे 11 दिवस गणराया पाहुणचार घेत असतो.
मुलांच्या उत्साहासाठी एक वर्ष दोन वर्ष गणरायाचं आगमन झालं की, तिसऱ्या वर्षी कंटाळा येतो. मग अशा वेळी शास्त्र काय म्हणतं. तर गणरायाबद्दल पाप पुण्य असं काही नसतं.
पण कुठल्याही गोष्ट ही सातत्याने केली पाहिजे. म्हणून कायम दूरदृष्टी ठेवून कुठलाही निर्णय घ्यावा.
खरं तर गणपती बसवणं हा कुळाचार नाही. त्यामुळे काही अडचण किंवा सोहेर सुतक आल्यास बाप्पाला घरी आणता आलं नाही तर त्यात काही तुम्हाला पाप लागत नाही.
काही कारणामुळे बाप्पाला घरी आणता आलं नाही तर त्याला क्षमा मागा. पण देवाला कधीही गृहीत धरु नका. बाप्पाचं हे एक व्रत आहे, त्यामुळे त्यांचं पालन नीट करा.
शास्त्रानुसार बाप्पाच्या मूर्तीबद्दल प्रथा आहे. त्यानुसार मातीपासून हातावर बसेल एवढीच उंचीच मूर्ती असावी. भक्त त्याचा सोयीने आणि उत्साहाने त्यात भर घालतो. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)