तुळशीची पूजा करून त्याजवळ दिवा लावण्याचे अनेक नियम आहेत.
धार्मिक मान्यतेनुसार एकादशीच्या दिवशी तुळशीमध्ये दिवा लावावा. या दिवशी पूजेत दिवा लावण्याची परंपरा आहे.
एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करावी. त्यासोबतच सूर्यास्तानंतर दिवा लावून प्रार्थना करावी.
तसेच या दिवशी तुळशीला स्पर्श किंवा पाने तोडू नयेत. असे केल्याने घरातील संकटे वाढू शकतात.
तुळशीला या दिवशी सकाळी जल अर्पण करू नये. कारण या दिवशी तुळशीमाता भगवान विष्णूसाठी निर्जल उपवास करते.
एकादशीच्या दिवशी तुळशीजवळ शुद्ध देशी तुपाचे 11 दिवे लावावेत. यानंतर 'ओम नमो भगवते वासुदेवाय नमः' या मंत्राचा जप करावा. तुळशीला 11 वेळा प्रदक्षिणा मारावी.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)