रवीना टंडनची मुलगी राशा थडानी 'आझाद' चित्रपटात डेब्यू करण्यासाठी तयार आहे. तिला पाहिल्यापासूनच अभिनेत्री व्हायचे होते.
परंतु राशाने हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यास सोडलेला नाही. चित्रपटाचे शूटींग ती शाळेत असल्यापासूनच सुरू झाले होते.
राशा ने शूटींगसोबत 12वी ची परीक्षा देखील दिली. तिच्या या अभ्यासाच्या तयारीचा व्हिडीओ समोर आला आहे.
राशा 12वीत होती तेव्हा तिने 'आझाद' चित्रपटाचे शूटिंग सुरू केले होते. तिने चित्रपट जितक्या गांभीर्याने घेतला, तितकाच अभ्यासही केला.
राशाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनंतर चाहते तिच्या अभिनयासाठी उत्सुक झाले आहेत. काही नेटकऱ्यांनी लिहिले - 'ही नेपोकिड्सला कठीण स्पर्धा देत आहे.'
राशाने 'धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल'मधून शिक्षण घेतले आहे. ऐश्वर्या राय, शाहरुख खानची मुलही याच शाळेत शिकतात.
राशा 19 वर्षांची आहे. अमन देवगणही तिच्यासोबत 'आझाद' या चित्रपटातून डेब्यू करत आहे. हा चित्रपट 17 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.