How To Calm Mind

How To Calm Mind: अशांत मनाला शांत करण्यासाठी प्रेमानंद महाराज यांनी सांगितले सोपे उपाय

अशांत मनाला शांत करण्यासाठीचे उपाय

विराट कोहली, अनुष्का शर्मा यांच्यासह देशातील अनेक बड्या व्यक्ती आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी श्रद्धास्थानी असणाऱ्या वृंदावन येथील प्रेमानंद महाराज सध्या बरेच प्रकाशझोतात आले आहेत.

प्रेमानंद महाराज

सोशल मीडियावर त्यांची अनेक प्रवचनंही व्हायरल होत आहेत. अशा या प्रेमानंद महाराजांनी अशांत मनावर नियंत्रण ठेवण्यासाठीसुद्धा काही उपाय सुचवले आहेत.

नामस्मरण

देवाच्या नावाचं नामस्मरण करून अशांत मन शांत करता येऊ शकतं. तुम्ही ज्या शक्तीवर, ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवता त्यांच्या नावाचं नामस्मरण करून एकाग्रतेनं मन शांत करा.

गुरुजनांची वचनं

मन अस्थिर असल्यास त्याला नियंत्रणात आणण्यासाठी तुमच्या गुरुजनांच्या वचनांचं स्मरण आणि उच्चरण करा. सिद्धपुरुषांची वचनं स्मरणात आणा, गीता किंवा एखादं पुराण ऐका असं प्रेमानंद महाराज सांगतात.

सत्संग

प्रेमानंद महाराज यांच्या म्हणण्यानुसार तुमचा ज्या कोणा व्यक्तीवर, महापुरुषावर विश्वास आहे त्यांची प्रवचनं एकाग्रतेनं ऐका.

सेवा करा

अशांत मन शांत करण्यासाठी अनेकदा सेवाभाव मोठी मदत करतो. त्यामुळं गरजू, गरिब, याचकांची सेवा करून तुमचं कर्म देवापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा असं प्रेमानंद महाराज सांगतात.

शांतता

प्रेमानंद महाराज सल्ला देतात की, मन अस्थिक असेल तेव्हातेव्हा काही वेळासाठी एकटे राहा. परिस्थिती समजून घेण्याचा विचार करा. दिवसातून किमान 20 ते 30 मिनिटं एकटे राहा, त्यामुळं मन स्थिर होतं.

VIEW ALL

Read Next Story