हिंदू धर्मात शतकानुशतके सापांची पूजा करण्याची परंपरा आहे.नागपंचमीच्या दिवशी नागदेवताची पूजा केली जाते.नागपंचमी 9 ऑगस्ट 2024 रोजी साजरी केली जाणार आहे.
पण तुम्हाला भारतातील असं मंदिर माहित आहे का जे फक्त नागपंचमीच्या दिवशीच उघडलं जातं.
असं म्हटलं जातं की या मंदिरात नागदेवताची पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात.
श्री नागचंद्रेश्वर मंदिर उज्जैनमध्ये स्थित आहे. हे मंदिर वर्षातून एकादाच भाविकांच्या दर्शनासाठी उघडलं जातं. त्यानंतर पूजा झाल्यावर पुन्हा मंदिराचे दरवाजे बंद केले जातात.
श्री महाकालेश्वर मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर श्री नागचंद्रेश्वर मंदिराची स्थापना केली आहे.
असे मानले जाते की माळवा साम्राज्याचा राजा भोज याने 1050 च्या सुमारास हे मंदिर बांधले. त्यानंतर सिंधिया घराण्याचे महाराज राणोजी यांनी 1732 मध्ये महाकाल मंदिराचा जिर्णोद्धार करून घेतला.
असे मानले जाते ती नागराज स्वत: या मंदिरात राहतात.नागचंद्रेश्वराची मुर्ती 11 व्या शतकातली आहे ज्यामध्ये शिव आणि पार्वती नागाच्या आसनावर बसलेले आहेत.
अशी मुर्ती जगातील फक्त याच मंदिरात असल्याचे म्हटले जाते ज्यामध्ये भगवान विष्णुंऐवजी भगवान भोलेनाथ विराजमान आहेत.
नागपंचमीच्य दिवशी नागचंद्रेश्वराची त्रिकाल पूजा केली जाते.