Vastu Tips : घरातील जिन्याखाली देव्हारा ठेवल्याने काय होतं?
पूर्वीसारखी मोठी घर नाहीत, अशात कमी जागेत अनेक गोष्टी समावून घेण्यासाठी घरातील कानाकोपरा वापरण्यात येतो
अशात घरात जर जिना असेल तर त्याच्या खालची जागेचाही उपयोग केला जातो.
तुम्ही जिन्याखाली देव्हारा ठेवला असेल तर काय होतं जाणून वास्तूशास्त्र काय सांगतं.
वास्तूशास्त्रात जिन्याखाली देव्हारा ठेवणे अशुभ मानले जाते.
शास्त्र असं सांगतं की, पायऱ्या चढताना किंवा उतरताना तिचा पाय देव घरावर पडतो.
त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो.
प्रगती आणि यशामध्ये अडथळा निर्माण होतो.
कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
घरात देव्हारा ठेवण्याची योग्य जागा ही पूर्व दिशा आहे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)