रक्षाबंधनाला सर्वात पहिली राखी कोणाला बांधावी?

रक्षाबंधनाच्या सण श्रावणातील तिसऱ्या सोमवारी 19 ऑगस्ट 2024 ला साजरा करण्यात येणार आहे.

यादिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधते. धर्मशास्त्रानुसार भावाला राखी बांधण्यापूर्वी कोणाला रक्षासूत्र बांधावे ज्यामुळे तुमचं संरक्षण होतं.

रक्षाबंधनाच्या दिवशी देवी - देवतांच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे. धर्मशास्त्रानुसार भावाला राखी बांधण्यापूर्वी देवाला राखी अर्पण करावी.

ज्या बहिणींना भाऊ नाही त्यांनी देवाला राखी बांधावी असं सांगण्यात आलंय.

श्रावण महिना असल्याने रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर भगवान महादेवाला राखी अर्पण करावी. त्यामुळे सर्व संकटांपासून तुमचं रक्षण होतं.

जीवनातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी विघ्नहर्ताला राखी अर्पण करावी.

संकट मोचन हनुमानाला राखी बांधल्यास अत्यंत फलदायी मानलं जातं.

अनेक ठिकाणी श्रीकृष्णाला भाऊ मानून राखी बांधण्याची परंपरा आहे.

तर काही ठिकाणी सर्प दोषापासून मुक्ती आणि संरक्षणसाठी नागदेवतेला राखी अर्पण करावी. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story