आधार कार्डचा वापर आज प्रत्येक ठिकाणी केला जातो. सरकारी कामे असो किंवा बँकेची कामे आधार कार्ड विचारलेच जाते.

आधार कार्ड दाखवताना त्यावरील फोटोमुळं कधी कधी अवघडलेपणा येतो. एक तर फोटो लहानपणीचा असतो किंवा फोटो खूपच खराब असतो.

पण तुम्हाला माहितीये का तुम्ही आधारकार्डवरील फोटो बदलूही शकता, कसं ते जाणून घेऊया

UIDAIकडून आधार कार्डवरील फोटो बदलण्याची सुविधा दिली जाते. फोटो बदलण्यासाठी 100 रुपये फी आकारली जाते.

घरबसल्याही तुम्ही आधारकार्डवरील फोटो बदलू शकता. त्यासाठी तुम्हाला Aadhar Enrolment/Correction/Update ही प्रक्रिया करावी लागेल.

UIDAI च्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही ही प्रक्रिया करु शकता. फॉर्ममध्ये सर्व डिटेल भरुन झाल्यानंतर आधार कार्ड केंद्रात जा

आधारकार्ड केंद्रात जाताना सर्व डॉक्युमेंट घेऊन जा. आधार केंद्रात जाऊन तिथे तो फॉर्म आणि कागदपत्रे एक्झिक्युटिव्हकडे द्या आणि सर्व प्रक्रिया फॉलो करा.

त्यानंतर आधार केंद्रात तुमची लाइव्ह फोटो काढण्यात येईल. फोटो चांगला येण्यासाठी तुम्ही आधीच तयारी करा. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही फोटोचा प्रिव्ह्यूदेखील बदलू शकता.

VIEW ALL

Read Next Story