हार्दिकसोबत घटस्फोटाच्या चर्चा; मुलाला घेऊन नताशा मायदेशी रवाना?

Published by: Zee Team | Jul 17, 2024

नात्यात दुरावा

भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅन्कोविक यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांनी मागील काही दिवसांपासून जोर धरला होता.

Published by: Zee Team | Jul 17, 2024

सूचक फोटो

अद्यापही हार्दिक किंवा नताशा या दोघांपैकी कोणीही त्यांच्या नात्यासंदर्भात कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. पण, त्यातच काही सूचक फोटो मात्र व्हायरल झाले आहेत.

Published by: Zee Team | Jul 17, 2024

अगस्त

हार्दिकपासून विभक्त/ घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान नताशा मुलगा अगस्त याच्यासह विमानतळावर दिसली. इथं ती छायाचित्रकारांनाही टाळण्याचा सातत्यानं प्रयत्न करत होती.

Published by: Zee Team | Jul 17, 2024

इन्स्टा स्टोरी

विमानतळावर पोहोचण्यापूर्वी तिनं एक इन्स्टा स्टोरी शेअर केली होती. ज्यामध्ये its that time of the year असं लिहिण्यात आलं होतं. यामध्ये तिनं घर आणि विमानाचं इमोजी जोडलं होतं.

Published by: Zee Team | Jul 17, 2024

सर्बिया

नताशाचं कॅप्शन आणि तिची स्टोरी पाहता ती मायदेशी म्हणजेच सर्बियाला परतत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Published by: Zee Team | Jul 17, 2024

शंका

नताशासोबत अगस्त्यला पाहून नेटकऱ्यांच्या मनात मात्र भलत्याच शंकेनं घर केलं आहे. ही शंका म्हणजे, नताशा सर्वकाही मागे सोडून भारतातून काढता पाय तर घेत नाहीय?

Published by: Zee Team | Jul 17, 2024

शंका कायम...

चर्चा कितीही झाल्या तरीही अद्यापही नताशा आणि हार्दिकच्या नात्याबाबत कोणतीच अधिकृत माहिती समोर आली नसून, ती नेमकी कुठं चाललीये याचीसुद्धा अधिकृत माहिती नाही हेच खरं.

Published by: Zee Team | Jul 17, 2024

VIEW ALL

Read Next Story