आशिया कपमध्ये (Asia Cup) आज भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) दोन्ही संघ भिडणार आहेत. दुपारी 3 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
आशिया कपची घोषणा झाल्यापासून सर्वजण या सामन्याची आतुरतेने वाट पाहत होते. दोन्ही देशांचे प्रेक्षक बाह्या आवरुन या सामन्याची वाट पाहत आहेत.
मैदानात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या या दोन्ही देशांचे खेळाडू मैदानाबाहेर मात्र एकमेकांची आपुलकीने चौकशी करताना दिसत आहेत. याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
यातील एका व्हिडीओत भारतीय आणि पाकिस्तानी संघाचे कर्णधार एकमेकांची आपुलकीने चौकशी करताना दिसत आहेत.
रोहित शर्मा आणि बाबर आझम यांची भेट झाली, तेव्हा इमाम-उल-हकदेखील सोबत होता.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने रोहित शर्मा, बाबर आझम आणि इमाम यांचा एक व्हिडीओ अपलोड केला आहे. व्हिडीओत रोहित शर्मा बाबर आझम आणि इमाम यांच्याशी हात मिळवत असल्याचं दिसत आहे.
यावेळी बाबर आझमने रोहितकडे त्याची मुलगी समायरा आणि कुटुंबाची चौकशी केली. त्यावर रोहितने आता मुलीची शाळा सुरु आहे, त्यामुळे कुटुंब आलं नाही असं सांगितलं
रोहितने पुढे म्हटलं की, घऱात कोणाला तरी थांबावं लागेल. त्यानंतर इमाम-उल-हकदेखील कुटुंब येणार नाही का? अशी विचारणा करतो.
त्यावर रोहित शर्मा सांगतो की, वर्ल्डकपला कुटुंब सामना पाहण्यासाठी येईल.