आशिया चषकासाठी संघ जाहीर झाला पण सामने कधी?

आशिया चषकाचे सामने कधी आणि किती वाजता खेळवले जाणार आहेत जाणून घ्या...

निवड समितीच्या प्रमुखांनी केली घोषणा

आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी संघाची घोषणा केली.

कोणकोण आहे संघात?

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, के. एल. राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या, यांचा संघात समावेश आहे.

भारतीय संघात यांचाही समावेश

रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्सर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा यांनाही संधी देण्यात आली असून राखीव खेळाडू म्हणून संजू सॅमसनचा समावेश करण्यात आला आहे.

स्पर्धा नेमकी कधी खेळवली जाणार?

मात्र भारतीय संघ जाहीर झाला असला तरी ही स्पर्धा नेमकी कधी खेळवली जाणार आहे. साखळी फेरीत कोणत्या संघाचा समाना कधी आहे. पाहूयात...

6 संघ आणि 2 गट

या स्पर्धेत भारताबरोबरच पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका हे 6 संघ खेळणार आहे. भारत, पाकिस्तान, नेपाळ 'गट अ'मध्ये तर उर्वरित संघ 'गट ब'मध्ये आहेत. पहिला सामना 30 ऑगस्ट रोजी असेल.

पहिला सामना

पाकिस्तान विरुद्ध नेपाळ - 30 ऑगस्ट

दुसरा सामना

बांगलादेश विरुद्ध श्रीलंका - 31 ऑगस्ट

तिसरा सामना

भारत विरुद्ध पाकिस्तान - 2 सप्टेंबर

चौथा सामना

बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान - 3 सप्टेंबर

पाचवा सामना

भारत विरुद्ध नेपाळ - 4 सप्टेंबर

सहावा सामना

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान - 5 सप्टेंबर

सामने किती वाजता सुरु होणार?

सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी सुरु होतील. दुपारी साडेतीन वाजता, एक वाजता, दीड वाजता असे सामन्यांचा सुरु होण्याचा वेळ असेल. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना दुपारी एक वाजता सुरु होईल.

VIEW ALL

Read Next Story