या गोष्टी हाईलाईट करा

रेझ्युमे बनवताना तुम्हाला सर्वात जास्त तुमचं शिक्षण आणि अनुभव या गोष्टी अधोरिखेत करायला हव्यात. इतर गोष्टींना कमी महत्त्व द्यायला हवं.

काही गोष्टींमुळे खराब होऊ शकतो रेझ्युमे

रेझ्युमेमध्ये काही गोष्टी अशा जातात ज्यामुळे तुमचा इंटर्व्हू खराब होऊ शकतो.

मोठा पॅराग्राफ

आपल्या रेझ्युमेमध्ये कधीही मोठा पॅराग्राफ लिहू नका. सगळं काही बुलेट पॉईंन्टमध्ये लिहा

इनफॉर्मल मेल आयडी

फोनशिवाय जर तुमच्या सोबत संपर्क साधण्यासाठी ईमेल आयडी महत्त्वाचा आहे. त्यामुळे ईमेल आयडी बनवताना नक्की काळजी घ्या.

स्पेलिंग मिस्टेक नको

रेझ्युमेमुळे तुमचं इंम्प्रेशन पडतं. त्यामुळे जर त्यात स्पेलिंगच्या चुका केल्या तर ते तुम्हाला महागात पडू शकते.

चुकीची माहिती

तुमच्याकडे जे गुण आहेत किंवा जेवढं तुमचं शिक्षण झालं आहे तशीच माहिती रेझ्युमेमध्ये द्या. खोटी माहिती देऊ नका.

पगार

आधी तुमचा पगार किती होता आता किती हवा आहे हे सगळं रेझ्युमेमध्ये चुकून पण लिहू नका. मुलाखतीला जाल तेव्हाच याचं उत्तर द्या. (सर्व फोटो - freepik.com)

VIEW ALL

Read Next Story