अश्विनने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

भारत आणि बांगलादेशदरम्यानच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या चिदंबरम स्टेडिअमवर खेळवला जात आहे.

या सामन्यात भारताचे स्टार फलंदाज फ्लॉप ठरले. कर्णधार रोहित शर्मा सहा धावांवर तर विराट कोहलीही सहा धावा करुन पॅव्हेलिअनमध्ये परतले.

प्रमुख फलंदाज बाद होत असताना टीम इंडियाचा दिग्गज ऑलराऊंडर रवीचंद्रन अश्विन मात्र खंबीरपणे खेळपट्टीवर उभा राहिला.

अश्विनने सामन्याच्या पहिल्या डावात अवघ्या 57 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. याबरोबरच अश्विनच्या नावावर एक शानदार विक्रमही जमा झालाय.

कसोटी क्रिकेटमध्ये 500 हून जास्त विकेट आणि 20 वेळा पन्नासहून जास्त धावा करणारा तो क्रिकेट जगतातला पहिला खेळाडू आहे.

अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 516 विकेट घेतल्या आहेत. तर सहा शतकंही त्याच्या नावावर आहेत. चेन्नई कसोटीत अश्वनने शानदार शतक झळकावलंय.

अशी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्टुअर्ट ब्रॉड दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्रॉडने कसोटी क्रिकेटमध्ये 604 विकेट घेतल्या असून 14 वेळा पन्नासहून जास्त धावा केल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story