टीम इंडियाचा विकेटकिपर आणि फलंदाज ईशान किशन पुन्हा एकदा चर्चेत आलाय. मैदानाबाहेरचा त्याचा एक फोटो व्हायरल झालाय आहे.


ईशान किशन भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधानाबरोबर दिसला. या फोटोमुळे चांगलीच चर्चा रंगलीय.


पण वास्तविक हा फोटो कौन बनेना करोडपतीच्या कार्यक्रमातील आहे. ईशान किशन आणि स्मृती मंधानाने या कार्यक्रमात भाग घेतला होता.


भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ईशान किशनचा टीम इंडियात समावेश करण्यात आला होता. पण दौरा अर्धवट सोडून ईशान किशन अचानक मायदेशी परतला.


ईशान किशनने वैयक्तिक कारणामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेत असल्याचं बोर्डाला कळवलं. पण कारणाचा कोणताही खुलासा त्याने केलेला नाही


ईशान किशनने गर्लफ्रेंड आदिती हुंडियासह लग्न करण्यासाठी दौऱ्यातू माघार घेतल्याचीही चर्चा रंगली आहे.


ईशान किशन आणि आदितीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जातंय.

VIEW ALL

Read Next Story