'भाग भाग... आया शेर' जसप्रीम बुमराहचं कमबॅक, मुंबई इंडियन्सने शेअर केला जबरदस्त फोटो

Published by: Zee Team | Aug 01, 2023

आयर्लंड दौऱ्यात तीन टी20 सामने खेळवले जाणार असून, बुमराहच्या नेतृत्वाखालील टीम इंडियात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

Published by: Zee Team | Aug 01, 2023

दुखापतीमुळे गेले बराच काळ बुमराह टिम इंडियापासून दूर आहे. यंदाच्या आयपीएल हंगामातही बुमरहा मुंबई इंडियन्सकडून खेळला नव्हता

Published by: Zee Team | Aug 01, 2023

आता मुंबई इंडियन्सने बुमराहचा एक फोटो शेअर केला आहे. यात बुमराह एका सिंहाबरोबर दाखवण्यात आला आहे.

Published by: Zee Team | Aug 01, 2023

या फोटोवर एक कॅप्शनही देण्यात आलं आहे. त्यात म्हटलंय भाग भाग भाग आया शेर, आया शेर, आया शेर...

Published by: Zee Team | Aug 01, 2023

बुमराहच्या या फोटोवर चाहत्यांनी भरपूर कमेंट केल्या आहेत. बुमरहाच्या कमबॅकवर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Published by: Zee Team | Aug 01, 2023

काही युजर्सने बुमराह वर्ल्ड कप खेळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तर काही युजर्सने आयपीएल अद्याप दूर आहे, इतक्या लवकर का फिट झालास असा प्रश्न विचारला आहे.

Published by: Zee Team | Aug 01, 2023

बुमराहसाठी आयर्लंड दौरा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेआधी बुमराहच्या तंदरुस्तीची चाचणी यानिमित्ताने होणार आहे.

Published by: Zee Team | Aug 01, 2023

बुमराह टीम इंडियासाठी जुलै 2022 मध्ये शेवटची वन डे खेळला. तर 20 सप्टेंबरमध्ये टी20 आणि जुलै 2022 मध्ये कसोटी सामना खेळलाय.

Published by: Zee Team | Aug 01, 2023

बुमराहने 30 कसोटी सामन्यात 128, 72 वन डेत 121, तर 60 टी20 सामन्यात 70 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये बुमराहच्या नावावर 145 विकेट जमा आहेत.

Published by: Zee Team | Aug 01, 2023

VIEW ALL

Read Next Story