टीम इंडियाचा प्रमुख फलंदाज जसप्रीत बुमराहचं पुनरामन झालं आहे. आयरलँडविरुद्धच्या टी20 सीरिजमध्ये बुमरहावर कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

आयर्लंड दौऱ्यात तीन टी20 सामने खेळवले जाणार असून, बुमराहच्या नेतृत्वाखालील टीम इंडियात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

दुखापतीमुळे गेले बराच काळ बुमराह टिम इंडियापासून दूर आहे. यंदाच्या आयपीएल हंगामातही बुमरहा मुंबई इंडियन्सकडून खेळला नव्हता

आता मुंबई इंडियन्सने बुमराहचा एक फोटो शेअर केला आहे. यात बुमराह एका सिंहाबरोबर दाखवण्यात आला आहे.

या फोटोवर एक कॅप्शनही देण्यात आलं आहे. त्यात म्हटलंय भाग भाग भाग आया शेर, आया शेर, आया शेर...

बुमराहच्या या फोटोवर चाहत्यांनी भरपूर कमेंट केल्या आहेत. बुमरहाच्या कमबॅकवर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

काही युजर्सने बुमराह वर्ल्ड कप खेळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तर काही युजर्सने आयपीएल अद्याप दूर आहे, इतक्या लवकर का फिट झालास असा प्रश्न विचारला आहे.

बुमराहसाठी आयर्लंड दौरा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेआधी बुमराहच्या तंदरुस्तीची चाचणी यानिमित्ताने होणार आहे.

बुमराह टीम इंडियासाठी जुलै 2022 मध्ये शेवटची वन डे खेळला. तर 20 सप्टेंबरमध्ये टी20 आणि जुलै 2022 मध्ये कसोटी सामना खेळलाय.

बुमराहने 30 कसोटी सामन्यात 128, 72 वन डेत 121, तर 60 टी20 सामन्यात 70 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये बुमराहच्या नावावर 145 विकेट जमा आहेत.

VIEW ALL

Read Next Story