आयपीएल 2024 नंतर पुढच्याच महिन्यात म्हणजे जूनमध्ये टी20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीला संधी मिळणार की नाही याबाबत साशंकता आहे.

विराट कोहलीने आयपीएल 2024 मध्ये सलग दोन सामन्यात अर्धशतकी खेळी करत आपला दावा मजबूत केला आहे. पण निवड समिती याकडे लक्ष देणार का हा प्रश्न आहे.

विराट कोहलीला संघात जागा मिळणार की नाही याचा फैसला या महिन्यातच होणार आहे. बीसीसीसीय निवड समिती या महिनाअखेरीस निर्णय घेऊ शकते.

PTI च्या रिपोर्टनुसार टी20 वर्ल्ड 2024 साठी 15 खेळाडूंच्या नावाची यादी पाठवण्याची अंतिम तारीख 1 मे आहे. म्हणजे त्या आधी निर्णय घ्यावा लागणार आहे.

विराट शिवाय केएल राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, जितेश शर्मा, युजवेंद्र चहल, आर अश्विन या खेळाडूंच्या कामगिरीवरही निवड समितीचं लक्ष असणार आहे.

भारतीय निवड समितीचे चारही सदस्य आयपीएल सामन्यांचा दौरा करत आहेत. खेळाडूंच्या कामगिरीबरोबरच त्यांच्या फिटनेसवरही निवड समिती लक्ष ठेऊन आहे.

1 मे रोजी आयसीसीला नाव पाठवण्यानंतरही संघात बदल करण्याचा पर्याय खुला असणार आहे. यासाठी 25 मेपर्यंतची डेडलाईन ठेवण्यात आली आहे.

VIEW ALL

Read Next Story