वेस्ट इंडिजविरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सलामीला आरेल्या ईशान किशनने शानदार अर्धशतकी खेळी केली.

याआधी बारबोडसमध्ये खेळलेल्या पहिल्या दोन सामन्यातही ईशान किशनने अर्धशतक झळकावलं होतं.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ईशान किशनने या मालिकेतील सलग तिसरं अर्धशतक केलं. अवघ्या 66 चेंडूत त्याने 77 धावा केल्या .

शुभमन गिलबरोबर ईशान किशनने 143 धावांची दमदार पार्टनरशि केली. आपल्या खेळीत ईशानने 8 चौकार 3 षटकार लगावले.

एका एकदिवसीय मालिकेत सलग तीन सामन्यात अर्धशतक करणारा ईशान सहा भारतीय फलंदाज ठरला आहे.

याआधी के श्रीकांत, दिलीप वेंगसरकर, मोहम्मद अझरुद्दीन, एम एस धोनी आणि श्रेयस अय्यर यांनी अशी कामगिरी केली आहे.

भारतीय विकेटकिपरबाबत बोलायचं झालं तर धोनीनंतर ईशान दुसरा विकेटकिपर आहे ज्याने एकाच सीरिजमध्ये सलग तीन अर्धशतकं केली आहेत.

याआधी भारताचा सर्वाच यशस्वी कर्णधार आणि विकेटकिपर एमएस धोनीने 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कामगिरी केली आहे.

ईशान किशनचं वेस्ट इंडिज दौऱ्यातलं हे चौथं अर्धशतक ठरलं आहे. याआधी त्याने वेस्टइंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत अर्धशतक केलं होतं.

इशान किशन आणि शुभमन गिल यांची 143 धावांची भागिदारी हा देखील एक विक्रम ठरला आहे. याआधी वेस्टइंडिज दौऱ्यात शिखर धवन आणि अजिंक्य राहाणे यांनी 132 धावांची पार्टनरशिप केली होती.

VIEW ALL

Read Next Story