ऑक्टोबर महिन्यात एकदिवसीय वर्ल्ड कप खेळवला जाणार असून भारत यंदा आयोजक आहे. याआधी 2011 मध्ये भारतात वर्ल्ड कप स्पर्धा झाली होती. 28 वर्षांनंतर टीम इंडियाने वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं.

Sep 14,2023


2011 वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळवला गेला होता. भारत - श्रीलंकेत झालेला हा सामना जबरस्त चुरशीचा झाला.


अंतिम सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मारलेला विजयी षटकार क्रिकेट चाहते आजही विसरलेले नाहीत. धोनीने थेट स्टेडिअममध्ये षटकार खेचला होता. हा चेंडू स्टेडिअममधल्या दोन खुर्च्यांवर पडला होता.


अंतिम सामन्याच्या 49 व्या षटकात नुवान कुलसेकराच्या गोलंदाजीवर धोनीने विजयी षटकार खेचला. हा चेंडू स्टेडिअममधल्या ज्या जोन खुर्च्यांवर पडला, त्या खुर्च्या '2011 वर्ल्ड कप मेमोरियल सीट्स' म्हणून ओळखल्या जातात.


त्याच दोन खुर्च्यांचा आता लिलाव केला जाणार आहे. एमसीएच्या वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. लिलावात जे या खुर्च्या जिंकतील त्यांना विशेष पॅकेज दिलं जाणार आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन खुर्च्यांची किंमत करोडो रुपयांपर्यंत पोहोचू शकते. या दोन खुर्च्यांना सुशोभित करण्यात येणार आहे. या सोफ्यासारख्या बनवल्या जाणार असल्याची माहिती आहे.


दरम्यान, स्टेडिअमधल्या सचिन तेंडुलकर स्टॅंडमधील 300 खुर्च्याही करोडोंना विकल्या जाणार आहेत. यंदाच्या वर्ल्ड कपस्पर्धेतील पाच सामने मुंबईच्या वानखेडे स्टेडिअममध्ये खेळवले जाणार आहेत.

VIEW ALL

Read Next Story