ढेर 'सारा' प्यार! सचिनच्या लेकीने मिळवलं मोठं यश, बापाला आभाळ ठेंगणं

Published by: Zee Team | May 24, 2024

सचिन तेंडूलकर

क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकरने सोशल मीडियावर पोस्ट करत एक गुड न्यूज दिलीये.

Published by: Zee Team | May 24, 2024

पदवी प्नदान समारंभ

सचिनची लेक सारा तेंडूलकरने मास्टर्स पूर्ण केलं. पदवी प्नदान समारंभाचा फोटो सचिनने शेअर केला अन् भावना व्यक्त केल्या.

Published by: Zee Team | May 24, 2024

सचिनच्या लेकीचं यश

आजचा दिवस माझ्यासाठी खूप सुंदर होता, असं म्हणत सचिनने लेकीच्या यशाची माहिती दिली.

Published by: Zee Team | May 24, 2024

मास्टर्स

माझ्या मुलीने युसीएलच्या मेडिसिन विभागातून, क्लिनिकल आणि सार्वजनिक आरोग्य पोषण मध्ये डिस्टिंक्शनसह मास्टर्स पूर्ण केलं, असं सचिनने सांगितलंय.

Published by: Zee Team | May 24, 2024

अभिमान

पालक या नात्याने इथे येण्यासाठी तुम्ही वर्षानुवर्षे केलेले सर्व काम पाहिल्याचा आम्हाला अभिमान वाटतो, असंही सचिनने म्हटलं आहे.

Published by: Zee Team | May 24, 2024

स्वप्नांसाठी यश

हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. भविष्यासाठी तुमच्या सर्व स्वप्नांसाठी तुझं हे यश आहे, असंही सचिनने लेकीसाठी म्हटलं आहे.

Published by: Zee Team | May 24, 2024

स्वप्न

मला विश्वास आहे की तू तुझं स्वप्न आता पुर्ण करशील, असंही सचिनने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Published by: Zee Team | May 24, 2024

VIEW ALL

Read Next Story