'कसं वाटलं सप्राइज?' हार्दिकच्या वाढदिवशीच नताशाने शेअर केली 'या' व्यक्तीसोबतची Romantic पोस्ट; चाहत्यांना बसला धक्का

Published by: Swapnil Ghangale | Oct 12, 2024

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने शुक्रवारी आपला 31 वा वाढदिवस साजरा केला.

Published by: Swapnil Ghangale | Oct 12, 2024

नताशाच्या पोस्टने बसला धक्का

मात्र हार्दिकच्या चाहत्यांना त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याच्या पूर्वाश्रमीची पत्नी नताशा स्टेनकोविकची एक पोस्ट पाहून मोठा धक्का बसला.

Published by: Swapnil Ghangale | Oct 12, 2024

नताशानेच केली पोस्ट

नताशा स्टेनकोविकने प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवबरोबरचा एक व्हिडीओ आपल्या अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे.

Published by: Swapnil Ghangale | Oct 12, 2024

रोमँटीक स्टाइलमध्ये

या व्हिडीओमध्ये नताशा स्टेनकोविक एल्विशबरोबर रोमँटीक स्टाइलमध्ये किनाऱ्यावर एकत्र चालताना दिसत आहे.

Published by: Swapnil Ghangale | Oct 12, 2024

कॅप्शन चर्चेत

हा व्हिडीओ शेअर करताना नताशाने, 'व्हायबिंग ऑन अ होल न्यू लेव्हल' अशी कॅप्शन दिली आहे. या पोस्टवर एल्विशने कमेंट करुन, "मित्रांनो कसं वाटलं सप्राइज?" असं चाहत्यांना विचारलं आहे.

Published by: Swapnil Ghangale | Oct 12, 2024

अनेकांनी हार्दिकला केलं टॅग

यावरुन अनेकांनी या पोस्टवर हार्दिकला टॅग करुन सप्राइज पाहिलं का असं विचारलं आहे. हार्दिकच्या अनेक चाहत्यांनी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी नताशाने हे असं काही करायला नको होतं असं म्हटलं आहे.

Published by: Swapnil Ghangale | Oct 12, 2024

कोण आहे एल्विश?

एल्विश यादव हा सोशल मिडिया इन्फ्युएन्सर आणि युट्यूबर आहे. एल्विशने बिग बॉस ओटीटी सिझन 2 चं जेतेपदही पटावलं आहे. यानंतर त्याच्या लोकप्रियतेमध्ये मोठी वाढ झाली.

Published by: Swapnil Ghangale | Oct 12, 2024

लग्नानंतर दोन महिन्यांनी झाले आई-बाबा

नताशा आणि हार्दिकने 31 मे 2020 रोजी लग्न केलं. त्याच वर्षी जुलै महिन्यामध्ये नताशाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. या मुलाचं नाव अगस्त्य असं ठेवलं आहे.

Published by: Swapnil Ghangale | Oct 12, 2024

घटस्फोट

जुलै 2024 मध्ये हार्दिक आणि नताशाने आपआपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन घटस्फोट घेत वेगळे होत असल्याचं जाहीर केलं.

Published by: Swapnil Ghangale | Oct 12, 2024

पुन्हा भारतात आली

घटस्फोटाच्या घोषणेनंतर नताशा अगस्त्याबरोबर तिच्या मूळ देशात म्हणजेच सार्बियाला गेली होती. काही दिवसांपूर्वीच ती मुलांसहीत मुंबईत परतली आहे.

Published by: Swapnil Ghangale | Oct 12, 2024

VIEW ALL

Read Next Story