मोहम्मद सिराजचं नाही, 'या' 5 भारतीय क्रिकेटर्सकडेही आहे सरकारी पद

Pooja Pawar
Oct 12,2024


भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने 11 ऑक्टोबर शुक्रवारी तेलंगणा पोलीस उपाधिक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे.


तेलंगणा सीएम रेवंत रेड्डी यांनी आधीच घोषणा केली होती की सिराजला प्रतिष्ठित ग्रुप-। चे सरकारी पद देण्यात येईल. त्यानुसार त्याला पोलीस खात्यात DSP पद देण्यात आले आहे.


परंतु एवढ्या मोठ्या सरकारी पदावर असणारा सिराज हा एकटाच नाही तर यापूर्वी 5 क्रिकेटर्स क्रिकेटर्सकडेही सरकारी पद आहेत.

सचिन तेंडुलकर :

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला 2010 मध्ये भारतीय हवाई दलात ग्रुप कॅप्टनची रँक देण्यात आली होती.


माजी गोलंदाज हरभजन सिंहचे खेळातील योगदान पाहून पंजाब सरकारने त्याला पंजाब पोलीसमध्ये DSP ची पोस्ट दिली आहे.

कपिल देव :

माजी कर्णधार कपिल देव यांना 2008 मध्ये भारतीय प्रादेशिक सैन्याने लेफ्टनंट कर्नल या प्रतिष्ठित रँकने सन्मानित करण्यात आले होते.

जोगिंदर शर्मा :

माजी गोलंदाज जोगिंदर शर्मा यांनी क्रिकेटरमधून निवृत्ती घेतल्यानंतर हरियाणा पोलिसमध्ये DCP पदावर कार्यरत आहेत.

एम एस धोनी :

2011 रोजी एम एस धोनीला भारतीय प्रादेशिक सैन्याने लेफ्टनंट कर्नल पद देऊन सन्मानित केले होते. 2019 च्या आयसीसी वर्ल्ड कपनंतर धोनीने दोन महिने भारतीय सैन्यदलात सेवा दिली होती.

VIEW ALL

Read Next Story