क्लिन बोल्ड

विक्रमांची चिरफाड करत सुटलेला 'हा' क्रिकेटपटूला प्रेमाच्या पिचवर चिअर लीडरकडून क्लिन बोल्ड

Quinton de Kock

वर्ल्ड़ कपच्या एकाच पर्वात 500 धावांचा टप्पा ओलांडणारा पहिला दक्षिण आफ्रिकन खेळाडू म्हणून सध्या Quinton de Kock चं नाव पुढे येत आहे.

विक्रमाशी बरोबरी

यंदाच्या पर्वात 7 सामन्यांमध्ये 4 शतकं झळकावणारा खेळाडू. या विक्रमासह त्यानं एबी डिविलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी केली असून, येत्या दिवसांत तो आणखी काही विक्रमही मोडण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे यंदाच्या वर्ल्ड कपनंतर वयाच्या तिसाव्या वर्षी तो आंतरराष्ट्रीत क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे.

विक्रमवीर

असा हा विक्रमवीर साशा हर्ले या चिअर लीडरच्या प्रेमात पडला होता. 2012 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजयानंतर शुभेच्छा देणाऱ्यांच्या गर्दीत साशाही होती.

मैत्री आणि प्रेमाचं नातं

साशाचे आभार मानण्यासाठी डिकॉकनं सोशल मीडयाचा आधार घेतला. इथंच त्यांनी Contact Number शेअर केले. पुढं त्यांच्यात मैत्री आणि प्रेमाचं नातं आकारास आलं.

साशासोबत लग्न

2016 मध्ये डिकॉकनं साशासोबत लग्न करत या नात्याला एक खास ओळख दिली. त्याच्या लग्नाला दक्षिण आफ्रिकेच्या संघातील अनेक खेळाडूंनी हजेरी लावली होती.

गोंडस मुलीचं आगमन

2022 मध्ये डिकॉक आणि साशाच्या नात्यात एका गोंडस मुलीचं आगमन झालं. साशा आणि डिकॉकनं कायमच त्यांच्या नात्यातून सुरेख संदेश दिले आहेत.

मुंबईच्या संघासाठी खास...

असा हा डिकॉक मुंबईच्या संघासाठीही तितकाच खास आहे, कारण मुंबई इंडियन्ससाठीही तो कायमच प्रभावी कामगिरी करताना दिसतो आणि साशाही त्याला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात हजर असते.

VIEW ALL

Read Next Story