आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना खेळवला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना खेळवला जातोय.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये केवळ एक बदल करण्यात आलाय. ईशान किशनच्या जागी शुभमन गिलला संधी देण्यात आली आहे.

पण सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे दिग्गज अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी का देण्यात आली नाही.

आर अश्विन टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज आहे. नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आर अश्विनचा रेकॉर्डही जबरदस्त आहे..

अहमदाबादच्या या मैदानावर आर अश्विनने 8 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात तब्बल 32 विकेट घेतल्य आहेत. पण यानंतरही अश्विनला संधी देण्यात आलेली नाही.

विश्वचषक स्पर्धेत सलग दुसऱ्या सामन्यात अश्विनला संघातून बाहेर बसवण्यात आलं आहे. याआधी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही अश्विन बेंचवर बसला होता.

याशिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीलाही संधी मिळेल असं बोललं जात होतं, अहमदाबाद हे शमीचं होमग्राऊंड आहे. पण त्यालाही संधी देण्यात आलेली नाही.

VIEW ALL

Read Next Story